रोहित पवारांच्या नावाने नवी संघटना; पण रोहित पवारांचा विरोध - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, September 2, 2020

रोहित पवारांच्या नावाने नवी संघटना; पण रोहित पवारांचा विरोध

 


मुंबई : 'रोहित पवार युवा ब्रिगेड' अशा नावाने बिगर राजकीय संघटना काही तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे. पण रोहित पवार यांना हा निर्णय पटलेला नाही. त्यांनी तात्काळ ट्विट करून त्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. 


रोहित पवार यांची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळेच काही काही तरुणांनी एकत्र येऊन रोहित पवार यांच्या नावे बिगर राजकीय संघटना स्थापन केली आहे. मात्र, चाहत्यांनी घेतलेला हा निर्णय पवार यांना पटलेला नाही. 


याबाबत केलेल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणे योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->